Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सातपूर विभागात अतिक्रमण निर्मुलन मोहीम; बीएसएनएलचे टॉवर, अनधिकृत शिकवणी सील

Share

नाशिक | प्रतिनिधी 

महापालिकेच्या सातपूर विभागात आज अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी केलेल्या कारवाईत जीवनज्योत हॉस्पिटलच्या इमारतीवरील बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर सील करण्यात आला आहे.

येथील आनंदवल्ली परिसरातील सदगुरु नगर, एमराल्ड पार्क रो-हाउस मधील इंदीरा सुरेंदर सिंग यांनी रहिवासी ऐवजी क्लासेससाठी सदर जागा वापरल्यामुळे क्लास बंद करण्यात आला.

अचानक अतिक्रमण निर्मुलन विभागाने केलेल्या कारवाईमुळे अनेकांनी धसका घेतला आहे. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे पथक, सातपूर विभागीय अधिकारी, नगरनियोजन विभागाचे अभियंता व दैनंदीन अतिक्रमण निमुर्लन मोहीम राबविण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी यावेळी नाशिक शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!