Video : नेहरू चौकातील ‘ती’ अतिक्रमित इमारत जमीनदोस्त

0
नाशिक | नेहरू चौकातील अतिक्रमण आज महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या इमारतीच्या मालकांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज या अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेने जेसीबी चालवला.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नाशिकमध्ये अतिक्रमण निर्मुलन मोहीम सर्वत्र राबविण्यात येत आहे.  महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नाशिकला बदली झाल्यापासून या मोहिमेला अधिक गती आली. महापालिकेचे अधिकारी फिल्डवर काम करताना दिसून येत आहेत.

मुंढेच्या शिस्तबद्ध कामाची अधिकारी वर्गाने चांगलीच धास्ती खाल्ली असून ठिकठिकाणी अतिक्रमण निर्मुलन मोहीम आणि स्वच्छतेचे कामे सुरु आहेत.

आज सकाळी नेहरू चौकात अनधिकृत बांधकाम असलेली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. पक्के बांधकाम असलेली तीन मजली इमारत पडण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली. बिल्डींग पाडली जात असल्याचे समजताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

गेल्या काही दिवसापूर्वी फुलबाजारातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यामुळे नियमित वर्दळ असलेल्या भागाने अनेक वर्षांनी मोकळा श्वास घेतला आहे. इमारतीतील साहित्य नेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

महापालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहीम अशीच सुरु राहणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असून अतिक्रमणामुळे कोंडलेल्या रस्त्यांना मोकळे करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*