मोठ्या फौजफाट्यासह नेहरू उद्यानातील अतिक्रमण हटाव मोहीम

0

नाशिक, ता. १३ : शहराच्या मध्यवर्ती भागातील नेहरू उद्यानाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आणि इतर हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

आज सकाळपासून महानगरपालिकेतर्फे हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

अनेक बड्या राजकारणी आणि पुढाऱ्यांचे यात हितसंबंध गुंतल्याने संभाव्य विरोध लक्षात घेऊन मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*