Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात आणखी चार करोनाबाधित; येवल्यात शिरकाव, नाशिकमध्येही २१ वर्षीय युवकाला लागण

नाशिक जिल्ह्यात आणखी चार करोनाबाधित; येवल्यात शिरकाव, नाशिकमध्येही २१ वर्षीय युवकाला लागण

 नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात आणखी चार करोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. येवल्यात पहिला रुग्ण आढळून आला असून नाशिक शहरातही २१ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. नाशिक शहरात आता करोनाचे ११ बाधित रुग्ण झाले आहेत. यामध्ये एक रुग्ण करोनामुक्त झाला आहे. शहरात आज आढळून आलेला तरुण मुंबईहून भंडारा येथे जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून यामध्ये चार कोरोनाबाधित आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ३२ वर्षीय तरुण हिम्मत नगर पोलीस लाईन परिसरातील असल्याचे समजते. तर २७ वर्षीय महिला याच परिसरातील असल्याचे समजते. ४८ वर्षीय महिला येवला येथील असून महिला कुठल्या परिसरातील आहे हे समजू शकले नाही. या सर्वांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर नाशिक शहरात एका २१ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली असून त्याच्यावर कठडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

येवल्यात पहिला रुग्ण आढळून आला असला तरी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले असून नागरिकांनी घाबरून न जाता घरातच थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नाशिक शहरात आढळून आलेला २१ वर्षीय तरुण हा सिक्युरिटी सर्विसेस मधील आहे. त्याच्यासोबत असलेल्या संशयितांचे अहवाल थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे.

मानखुर्द , मुंबई येथून तो भंडारा जिल्ह्यात जात असताना 22 एप्रिल रोजी त्यास नाशिक रोड पोलिसांनी पकडले होते. त्याच्यासोबत तब्बल अकरा जण होते. पोलिसांनी पकडून त्यांना कठडा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचे नमुने घेण्यात आले.

त्यातील एक केरोना बाधित आला आहे. त्याच्या सोबत असलेले 11 जण आधीच रुग्णालयात दाखल असल्यामुळे चिंतेचे कारण नाही असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर त्र्यंबके यांनी स्पष्ट केले आहे.

Nashik District Update

Nashik Corporation:
Positive:11
Death:00
Recovered :01

Nashik Rural:
Positive:05
Death:00
Recovered:01

Malegaon Corporation:
Positive: 118
Death:13

NASHIK DISTRICT Total
Positive :134

- Advertisment -

ताज्या बातम्या