जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी करोना बाधित ५० रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी  करोना बाधित ५० रुग्ण

बाधितांची एकूण संख्या ६२१

जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 621 इतकी झाली आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याचा उच्चांक जळगाव जिल्ह्याने गाठला आहे.

शुक्रवारी एकट्या जळगाव शहरात एकूण 11 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. खोटेनगर, जुने जळगाव, मेहरूण परिसरातील रुग्णांचा यात समावेश आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील एकूण 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्रशासनास प्राप्त झाले. त्यापैकी 172 अहवाल निगेटीव्ह आले तर 24 अहवाल पॉझिटीव्ह आले.

पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगाव शहरातील आठ, भुसावळच्या चार, सावदा येथील दोन, तर पारोळा येथील चार रुग्णांचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यात खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या व्यक्तींचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले. त्यात पॉझिटीव्ह आढळून आलेल्या व्यक्तींमध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटेनगर, जुने जळगाव, मेहरूण येथील तीन व्यक्तींचा समावेश आहे.

तिसर्‍या टप्प्यात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आणखी 119 कोरोनासंशयीत व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 98 अहवाल निगेटीव्ह तर 21 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चाळीसगाव येथील तीन, चोपडा येथील पाच, धरणगाव येथील दोन, वरणगाव येथील पाच, एरंडोल येथील तीन, भडगाव येथील एक, तर रावेर तालुक्यातील निंभोरा येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण 50 पॉझिटीव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे. शुक्रवारी एकट्या जळगाव शहरात एकूण 11 रुग्ण आढळून आल्यामुळे एकट्या जळगाव शहराची आतापर्यंत पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 59 इतकी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com