‘कृषिथॉन’ गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर

0
नाशिक |दि. १८ प्रतिनिधी- कृषीक्षेत्रात युवावर्गाचा सहभाग वाढावा यासाठी असे शिक्षण घेत नैपुण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने दिले जाणारे ‘कृषीथॉन’ गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

विविध कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाला असणार्‍या तसेच कृषी विस्तार, संशोधनाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय असणार्‍या उपक्रमशील विद्यार्थ्यास ‘गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण कृषीथॉन मधील मुख्य सभागृहात रविवारी (दि.२६) सकाळी दहा वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर, रामेती-नाशिकचे प्राचार्य सुनील वानखेडे, सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि रिसर्च, मुंबई येथील प्रा. किरण यादव यांंची यावेळी उपस्थिती असणार आहे.

गुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कार : प्रथमेश तिजारे(चंद्रपूर), हितेश बघेले(गोंदिया),दादासाहेब ढेपले(उस्मानाबाद), चेतन कासुर्डे (लातूर) दत्तात्रय संकपाळ(धुळे), समीक्षा हेमगिरे,जैनापूर(कोल्हापूर), उत्कर्ष माने, वडाळा (सोलापूर), आकांक्षा धपाटे, बारामती (पुणे), मनोहर मोहिते, शहादा (नंदुरबार), आदित्य पोखरकर, गांधेली (औरंगाबाद), नितीन शिंदे, दहेगाव (औरंगाबाद), सौरभ सोनवणे अमळनेर(जळगांव), रुपाली चांदगुडे (अहमदनगर),

प्रवीण घुले येवला (नाशिक),अनुराधा वाव्हळे (नाशिक), प्रशांत जगताप, (नाशिक), मेघा मडके (यवतमाळ), अश्विनी निलावर, पोखर्णी (नांदेड), ओंकार साठे, लोणी(अहमदनगर), संदीप कोकाटे,(नाशिक) रविजा पिंगळे, राहुरी (अहमदनगर), अनिल राठोड(अकोला), मदन जाटीया (बीड), अक्षय फरतडे(जळगाव), शुभम गव्हाणे (नाशिक), कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखा : गणेश आहेर, बालेवाडी (पुणे), सायली गावडे, आकुर्डी (पुणे), किशोर दळवे, नारायणगाव (पुणे), मयुरी शिंदे, लोणी(अहमदनगर), सौरभपगार(नाशिक).

अन्न तंत्रज्ञान :श्रद्धा पंडित,लोणीकाळभोर(पुणे), लव शानावरे,(जळगाव), सुजित वाबळे (नाशिक).
उद्यानविद्या शाखा: गणेश शेलार(नाशिक), सुनील गायकवाड, मालेगाव (नाशिक)
विद्यापीठ स्तरीय पुरस्कार :डॉ. विनायक शिंदे-पाटील, जुनागढ कृषी विद्यापीठ,गुजरात.

LEAVE A REPLY

*