Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुढील वर्षी होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी  फेब्रुवारी महिन्यात १२ वी ची परीक्षा १८ मार्च २०२० पासून तर दहावीची परीक्षा ०३ मार्च २०२० पासून सुरु होतील असे जाहीर करण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून आज सायंकाळी एका परीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.

चालू शैक्षणिक वर्षासाठी १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे दिवाळीच्या आधीच विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने सुखद धक्क्का दिला आहे.

दहावीचे वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा

दिवाळीच्या निमित्ताने असलेल्या सुट्ट्यांचा वापर हे विद्यार्थी अभ्यास करण्यात घालून जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहेत. तसेच दहावी बारावीचे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेचा अतिरिक्त ताण घेतात, यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा लवकर जाहीर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे.

बारावीचे वेळापत्रक बघण्यासाठी इथे क्लिक करा

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शिक्षण विभागाकडून परीक्षेपूर्वी कनिष्ठ महाविद्यालय आणि शालेय व्यवस्थापनास पाठवले जाईल असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!