‘क्रिश 4’ची घोषणा : राकेश रोशन यांनी हृतिकला वाढदिवसाला दिले गिफ्ट

0

बुधवारी हृतिक रोशनच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त राकेश रोशन यांनी ‘क्रिश 4’ची घोषणा करत हृतिकला आणि त्याच्या चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे.

ट्विटरवर राकेश रोशन यांनी ही घोषणा केली. ”क्रिश 4’च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्याचा आजचा दिवस सर्वोत्तम आहे. 2020 च्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हृतिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सर्व चाहत्यांसाठी ही भेट आहे,’ असे ट्विट त्यांनी केले. क्रिश 3’मध्ये विवेक ओबेरॉयने खलनायकी भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या चौथ्या सीरिजची घोषणा केल्यानंतर त्यानेही आनंद व्यक्त केला.

‘क्रिश’च्या मागील दोन चित्रपटांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती. मात्र या चौथ्या सीरिजमध्ये कोणती अभिनेत्री हृतिकसोबत भूमिका साकारणार याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.’

LEAVE A REPLY

*