आरोग्य विद्यापीठाचा १० ला वर्धापनदिन

0
नाशिक, दि.७, प्रतिनिधी- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १९ वा वर्धापनदिन समारंभ शनिवार दि. १० जून २०१७ रोजी नाशिक मुख्यालयातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये सकाळी ११ वाजता होणार आहे. या समारंभास केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री मा. ना. श्री. श्रीपाद नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. गिरीष महाजन कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत व वैद्यकीय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत असे मा. कुलगुरु प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी कळविले आहे.

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगीतले की, या समारंभामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी आणि विविध विद्याशाखांमधून उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

तसेच उत्कृष्ट खेळाडु विद्यार्थी पुरस्कार, विशेष कौतुक व गुणवंत समाज सेवा पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एकक पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास मोठया संख्येने हजर राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*