अण्णा हजारे लोकपालसाठी आंदोलनाची घोषणा करणार

0

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज राजघाटावरुन मोदी सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.

लोकपाल आणि स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा हजारे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

अण्णा गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करत आहेत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येतं. त्यामुळे जर अण्णांनी आंदोलनाची घोषणा केली, तर त्यावर मोदी सरकार त्याला कसं प्रतिसाद देतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

LEAVE A REPLY

*