मोदी सरकारने लोकपाल विधेयक कमकुवत केले : हजारे

0

भोपाळ – यूपीए सरकारने पारित केलेला लोकपाल विधेयक मोदी सरकारने कमकुवत केल्याचे आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

मध्य प्रदेशातील पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या खजुराहोमधील एका संमेलनादरम्यान ते बोलत होते. मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली आहे.

अण्णा म्हणाले की, मनमोहन सिंह बोलत नव्हते, मात्र त्यांनी लोकपाल – लोकायुक्त कायद्याला कमकुवत केले. आता पंतप्रधान मोदींनीही हा कायदा कमकुवत करण्याचे कामकाज केले आहे. मनमोहन सिंह यांनी कायदा तयार केला.

त्यानंतर मोदींनी 27 जुलै 2016 रोजी एक दुरूस्ती विधेयकाअंतर्गत हे निश्चित केले, की अधिकारी त्यांची पत्नी, मुले यांना त्यांच्या संपत्तीचा वार्षिक तपशील द्यावा लागणार नाही, तर लोकपालमध्ये हा तपशील देणे आवश्यक होते, तसेच जो कायदा पाच वर्षात झाला नाही, त्याला तीन दिवसात कमकुवत करण्यात आले, असा आरोपही अण्णांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी लोकपाल विधेयक पारीत करण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच देशाबाहेरील काळा पैसा देशात आणू असे म्हटले होते. मात्र, त्यांनी तसे न करता देशातील जनता, शेतकरी, नोकरदार यांच्यावर अन्याय होणारेच निर्णय घेतले. त्याविरोधात आता अण्णा व त्यांच्या टीमकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*