Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पारनेरच्या प्रलंबित पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जेलभरोची तयारी ठेवा

Share

पद्मभूषण अण्णा हजारे ; ‘आम्ही पारनेरकर’ देशाला नवी दिशा देईल

सुपा (वार्ताहर) – तालुक्यातील विविध क्षेत्रांतील भूमिपुत्रांनी एकत्र येत पाणीप्रश्न व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी सुरू केलेले ‘आम्ही पारनेरकर’ सामाजिक विचारपीठ राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे ठरणार आहे. पारनेरच्या पाणी प्रश्नासाठी जेलभरो आंदोलनाची तयारी ठेवा. मी तुमच्यासोबत सर्वात पुढे असेन, अशी प्रेरक ग्वाही ज्यष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

रविवारी राळेगणसिद्धी परिवार आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान व पारनेर तालुका पत्रकार संघ यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘आम्ही पारनेरकर सामाजिक विचारपीठ’च्या माध्यमातून पारनेर तालुक्याचा पाणीप्रश्न व स्पर्धा परीक्षा याविषयावर राळेगणसिद्धी येथे आयोजित मेळाव्यात श्री. हजारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

मेळाव्याची भूमिका आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बांडे यांनी मांडली. स्वागत व प्रास्ताविक राळेगणसिद्धी परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे यांनी केले.

जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे आझाद ठुबे माजी सभापती राहुल झावरे, गणेश शेळके, सरपंच डॉ.राजेश भनगडे, पत्रकार दादा भालेकर कैलास लोंढे विलास गोसावी, सतीश भालेकर, वसंत थोपटे यांनी पाणी प्रश्नावर भूमिका मांडल्या. स्लाईड शोद्वारे विविध प्रस्तावित व पूर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

यावेळी दूध सघाचे अध्यक्ष राहुल शिंदे बाबासाहेब तरटे माजी सभापती बाबासाहेब तांबे राम पठारे पद्माकर भालेकर, शंकर नगरे, डॉ.वासुदेव साळुंके, शिवाजी व्यवहारे, सुखदेव पवार, सखाराम ठुबे, संयोजन समितीचे डॉ. गणेश पोटे, संतोष सोनावळे, मच्धिंद्र लंके, राजेश भंडारी, दादा पठारे, सनी सोनावळे, लाभेश औटी, गणेश भोसले, सुनील हजारे, गणेश भापकर, शरद पवळे, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास आबूज, माजी अध्यक्ष मार्तंड बुचुडे, पत्रकार विनोद गोळे, दत्तात्रय शेरकर, अ‍ॅड गणेश कावरे, पत्रकार बंडुशेठ वाघमारे, पत्रकार उदय शेरकर, कल्याण थोरात, डॉ. संजय बांडे, प्रताप खिलारी, सुरेश निवडुंगे, संदीप कोरडे, संदीप खिलारी, दादा झावरे, दाम झावरे, नाना आवारी आदींसह मोठ्या संख्येने पारनेर व नगर तालुक्यांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक प्रश्न सुटण्यास विलंब लागत असतोच; पण त्यासाठी केलेले प्रयत्न प्रामाणिक असतील तर ते नक्की सुटतात. राजकारण विरहीत मोठे सामाजिक संघटन उभे राहावे. निवडणूक संपली की राजकीय जोडे बाजूला ठेवावेत.सरकार आंदोलनाला घाबरत नाही ते पडण्याला घाबरते. त्यामुळे सरकार पाडण्याची ताकद निर्माण करा. पारनेर तालुक्यातील विविध प्रश्नांचा सर्व्हे करून तो शासनाला सादर करा. शासनदरबारी आपण मिळून पाठपुरावा करू.
अण्णा हजारे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!