सैनिकांचे अमूल्य योगदान : हजारे

0

माजी सैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन

पाडळी रांजणगाव (वार्ताहर) – देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान अमूल्य असून शहीद जवान यांच्या विधवा पत्नी आईवडील यांचा सन्मान करुन त्यांच्या असणार्‍या समस्या दूर करण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद, असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे म्हणाले.

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे माजी सैनिक मेळावा पार पडला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री. हजारे बोलत होते. यावेळी निवृत्त कर्नल सुहास जतकर, निवृत्त मेजर र. गो. कुलकर्णी, निवृत्त ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, निवृत्त कर्नल विश्वनाथ तुळशीराम कळमकर, निवृत्त शिक्षण अधिकारी मनोहर वीर, सरपंच सुरेश बोरुडे, विठ्ठलराव शेळके, माजी महाराष्ट्र केसरी पै.अशोक शिर्के, जयहिंद सैनिक सेवा फांउडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा आशाताई साठे, पारनेर तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष सहदेव घनवट उपस्थित होते.

सैनिकांच्या कुटुंबाला उद्भवणार्‍या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निवृत्त कर्नल साहेबराव शेळके व त्यांची टीम कौतुकास्पद उपक्रम राबवीत आहे. असे हजारे म्हणाले. यावेळी शहीदांचे माता-पिता, पत्नी, माजी सैनिक पत्नी आणि विधवा व माजी सैनिक, विद्यार्थी यांचा सत्कार केला.

यावेळी निवृत सैनिक सुधाकर कळमकर, नारायण तानवडे, दिगंबर शेळके, विक्रम औटी, शिवाजी देठे, सखाराम घनवट, काशीनाथ कळमकर, राजेंद्र शेळके, मोहन यादव, नामदेव तानवडे, जगन्नाथ जावळे, भाउसाहेब करपे, सचिन दहिफळे, नामदेव तरटे, अप्पासाहेब देशमुख, हनुमंत भोगावडे, दत्तात्रय लोखंडे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कर्नल सुहास जतकर यांनी माजी सैनिकांना नोकरीविषयी मार्गदर्शन केले. कर्नल साहेबराव शेळके यांनी स्वागत केले, तर कर्नल विश्वनाथ कळमकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*