22 ते 26 दरम्यान नाशकात अंकुर फिल्म फेस्टिव्हल; पद्मश्री गिरीश कासारवल्लींच्या हस्ते उद्घाटन

0
नाशिक। दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट नाशिक यांच्यातर्फे 22 ते 26 नोव्हेेंबर या कालावधीत 6 व्या अंकुर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड नाशिक येथे हा फेस्टिव्हल होणार असून पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या फेस्टिव्हलला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रंजीत गाडगीळ, अविनाश नेवे यांनी दिली.

फरिदा पाशा माहितीपटकार या समारोपासाठी उपस्थित राहणार असून तीन वेगवेगळ्या विषयावर मान्यवरांची कार्यशाळाही आयोजित करण्यात आलेली आहे. फेस्टिव्हलची सुरुवात 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. अंकुर फिल्म फेस्टिव्हल लोगो आणि स्मृतीचिन्ह अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर समुदाय व्हिडीओचे सादरीकरण करून फेस्टिव्हलची सुरुवात होईल.

याप्रसंगी गिरीश कासारवल्ली यांची इमेज अ‍ॅण्ड रिफलेक्शन ही फिल्म दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर प्राध्यापक, ऋषीकेश इंगळे हे गिरीश कासारवल्लींची प्रकट मुलाखत घेणार आहेत. समारोपात फरीदा पाशा यांच्या माय नेम इज सॉल्ट या माहितीपटाच्या सादरीकरणाने होणार आहे. यंदा फेस्टिव्हलमध्ये 100 हून अधिक फिल्मचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यात माहितीपट, शॉर्ट फिल्मस आणि अ‍ॅनिमेशनपट यांचा समावेश आहे.

या सर्व फिल्म राजस्थान, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यासह सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यामधून आल्या आहेत. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या 7 फिल्मसचा समावेश यात आहे. 23 नोव्हेंबररपासून सकाळी 10.30 ते रात्री 9 या कालावधीत फिल्म प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

अंकुर फिल्म फेस्टिव्हलमध्ये उमेश कुलकर्णी यांच्या कुंभ फिल्मचे सादरीकरण होणर आहे. याशिवाय जयेश आपटे हे वेब सिरीजचे सादरीकरण करीतील. तसेच दीपा बक्षी यांच्या कथ्थक नृत्याचेही सादरीकरण आणि प्रेक्षकांशी संवाद होणार आहे. तरी या फेस्टिव्हलला नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भिकन दंडगव्हाळ, जीतू पगारे, काजल बोरस्ते आदींनी केले आहेत.

या कार्यशाळा होणार : या फेस्टिव्हलमध्ये फिल्म अ‍ॅप्रीसेशनवर 23 नोव्हेंबरला तर 25 नोव्हेंबरला प्राध्यापक फैज उल्ला यांची मोबाईल फिल्म मेकिंंग या विषयावर दुसरी कार्यशाळा होणार आहे. तिसरी कार्यशाळा 23 नोव्हेंबरला सिनेमॅटोग्राफी या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

*