Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

Share

अहमदनगर | प्रतिनिधी

इंदोरीकर महाराजांवर पीसीपीएनडिटी कायद्यासह महिलांची कीर्तनातून अवहेलना करत खिल्ली उडवली म्हणून आईपीसी कायद्यांव्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अहमदनगर इथे पीसीपीएनडिटी सल्लागार समिती कडे करण्यात आली.

या मागणीचे निवेदन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अंनिसच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी केली.

इंदोरीकर महाराज समविषय तारखेचा संदर्भदेत मुलगा किंवा मुलगी याबाबत जाहिरात करून पीसीपीएनडिटी कायद्याच्या कलम २२ चा भंग करत आहेत, तसेच ते वारंवार आपल्या कीर्तनातून महिलांची अवहेलना करत असतात.

त्यामुळे त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करावा. तसेच महाराजांनी केलेल्या वक्तव्याला धार्मिक ग्रंथांचा आधार घेत दिला जात असलेला दाखला कायद्यापुढे न चालणारा आहे.

एकीकडे स्त्री जन्मदर प्रचंड घसरला असल्याने देशात महाराष्ट्राने पीसीपीएनडिटी कायदा सर्वप्रथम केला आहे, मात्र आता त्या कायद्याची पायमल्ली जर कोणी करत असेल तर त्या व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करणे हे सामाजिक हितासाठी गरजेचे असल्याचे मत ऍड. गवांदे यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!