प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा बंद : भास्करगिरी महाराजांनी केले वांगी ग्रामस्थांचे कौतुक

0
खिर्डी (वार्ताहर)- देवाला प्रसंन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रण्याचा बळी देण्याची प्रथा आहे बळीसाठी बोकड, कोबंडे, मेंढीचे कोकरु, अशा प्राण्याची बळी देवाला प्रसन्न करण्यासाठी दिली जाते. मात्र श्रीरामपुर तालुक्यातील वांगी येथील प्राण्यांची बळी देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या 100 वर्षापासून वांगी येथे बिरोबाचे देवस्थान आहे. 100 वर्षापासून जानेवारी ते फेबु्रवारी दरम्यान येणार्‍या पौर्णिमेच्या आधीच्या रात्री या ठिकाणी 120 ते 125 प्राण्यांचा बळी दिले जातात आणि दुसर्‍या दिवशी या ठिकाणी यात्रेचे आयोजन केले जाते.
गेल्या 100 वर्षाच्या परंपरेला आता वांगी ग्रामस्थांनी खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागामध्ये जास्त करुन मेंढपाळ समाज असल्याने या ठिकाणी जर मेंढयावर कोणता रोग आला किंवा एखादे काम होत नसेल तर या ठिकाणीच्या असलेल्या बिरोबाला नवस केला जात असे.
ग्रामस्थांची या प्रथेविषयी बैठक घेऊन बंद करण्याचा निर्णय देवगडचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांच्याकडे सोपवण्यात आला होता. भास्करगिरी महाराज जो निर्णय देतील तो सर्वाना मान्य राहील, असे ग्रामस्थांनी निश्‍चित केले. काल वांगी येथील बिरोबा मंदिरात या विषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी व्यासपिठावर देवगडचे मठाधिपती भास्करगीजी महाराज, हनुमानगडाचे भागवतार्चाय कृष्णाजी मते महाराज, अर्जुन महाराज हळनोर, किसन महाराज पवार, सद्गुरु रामगिरीजी गुरुकुले, संदिप महाराज जाधव, जगन्नाथ बिडगर, रावसाहेब माने, कल्याण लकडे, गोरक्षनाथ पारखे,केशव विटनोर,
संजय भिसे, आसाराम पिसाळ, कैलास पिसाळ, दिंगबर हळनोर, भागाजी होडगर बाबासाहेब येळे, उघडे, तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. या कार्याक्रमाप्रसंगी बळी ही प्रथा बंद करुन या ठिकाणी एका वेगळा आदर्श निर्माण केले आहे. भास्करगीजी महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*