Thursday, May 2, 2024
Homeनाशिकवाढत्या उन्हाचा पाळीव जनावरांनाही त्रास; अशी घ्या काळजी!

वाढत्या उन्हाचा पाळीव जनावरांनाही त्रास; अशी घ्या काळजी!

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात ऊन (heat) चांगलेच तापु लागले आहे. उन्हामुळे माणसांच्या शरीराची जशी लाहीलाही होते त्याचप्रमाणे पाळीव जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. म्हशींमध्ये उष्णतेस असणाऱ्या कमी प्रतिकारशक्तीमुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतांना दिसत आहे.

- Advertisement -

दूध देणाऱ्या गायी-म्हशी (Cow-buffalo), बकऱ्यांना शक्यतो थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात राहिले तर त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होतो. वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी होत आहे. पाणी पिण्याचे प्रमाण वाढलेे आहे. दुधात घट जाणवत आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले दंडुकेशाहीनं…

दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे त्यांचा जास्त कल आहेे. उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढतेे. उन्हाळ्यात अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी व अति उष्णता यांचा त्रास होतो.

जगण्यासाठी आवश्यक त्याच शरीरक्रियांचा शरीरास बराच ताण असतो. त्यामुळे प्रजननक्रिया थांबते किंवा प्रजननक्रियेस हानी होते. मार्चपासुन ते जूनपर्यंत वातावरणातील उष्णता वाढते, म्हणुन चारा व पाण्याचे व्यवस्थापन करा असे आवाहन जिल्हा पशुवैद्यकीय अधीकारी (Veterinary Officer) डॉ. गर्जे यांनी केले आहे.

Barsu Refinery Protest : ”हा सर्वे थांबवा, नाहीतर…”; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांची उदय सामंतांशी चर्चा

जनावरांना (animals) दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून 3 ते 4 वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. नाही तर चारा 30 टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने खातात. अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना थंड पाणी पाजावे.असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या