Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअटक टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी वकीलामार्फत दिले उत्तर

अटक टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी वकीलामार्फत दिले उत्तर

मुंबई:

100 कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची धावाधाव सुरू झाली आहे. त्यांनी ईडीला (ED)पत्र पाठवून विनंतीच केली आहे.

- Advertisement -

निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील रेव्ह पाटर्य़ां कशा रोखणार ?

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे की, मी ईडी (ED)कार्यालयात उपस्थित राहू शकत नाही, माझं वय ७२ वर्ष आहे आणि मला अनेक आजार आहेत. याऐवजी मी व्हर्च्युअल पद्धतीने आपलं स्टेटमेंट देऊ शकतो.

मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने (ED) देशमुख यांच्याविरोधात फास आवळला आहे. त्यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीने (ED) अटक केली. या कारवाईनंतर अनिल देशमुखांची चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु वकीलांमार्फत अनिल देशमुखांनी आपण हजर राहू शकणार नाही असं सांगून वेळ मागून घेतला होता.

ईडीने समन्स बजावल्यामुळे अनिल देशमुख यांना आज चौकशीला हजर राहावे लागणार होते. परंतु, अनिल देशमुख यांनी वकिलांचा सल्ला घेऊन पुढील पाऊल टाकत आहे. आज सकाळी त्यांच्या शासकीय निवास्थान ज्ञानेश्वरी बंगल्यावर हालचालींना वेग आला होता. वकिलांची टीम सकाळीच घरी आली होती. अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर वकील टीम घरातून निघाली. पण ईडी कार्यालय दिशेन मात्र ही टीम गेलेली नाही. याआधीही देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. अटक टाळण्यासाठी अनिल देशमुखांनी वकीलामार्फत त्यांनी ईडीला उत्तर दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या