Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

एनआयएचे उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये ७ ठिकाणी छापे

Share
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये छापे टाकले आहेत. इस्लामी दहशतवादी संघटना ‘इसिस’शी संबंधीत मॉड्यूल प्रकरणी दाखल असलेल्या एका प्रकरणाच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एनआयएच्या अधीक्षकांनी एएनआय या वृत्त संस्थेला  दिली आहे. एनआयएच्या पथकाकडून पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील 7 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून शोधमोहीम सुरू केली आहे.

याआधी एनआयने उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील १७ ठिकाणी छापे टाकून घातपाताचा मोठा कट उधळला होता. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटके, शस्त्रास्त्रे, देशी बनावटीची रॉकेट लाँचर तसेच आत्मघाती हल्ले करण्यासाठीची वापरली जाणारी सामुग्री जप्त करण्यात आली आहेत. या छाप्यात दहशतवादी संघटना इसिसच्या १० संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोघांना अटक केली होती.

इसिसच्या ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ हा नव्या गटाचा देशातील गर्दीच्या ठिकाणी घातपात घडविण्याचा आणि अतिमहनीय व्यक्ती आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट होता, असे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यासाठी त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी एनआयएकडून कारवाई सुरू आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!