Video : मायलेक हत्या प्रकरण : गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; संतप्त गावकऱ्यांची मागणी

गावकऱ्यांनी केला कृष्ण्गाव ते वणी पोलीस स्टेशन पायी प्रवास

0

नाशिक | मायलेक हत्येच्या निषेधार्थ आज कृष्णगांव येथे शोकसभा घेण्यात आली तसेच कृष्ण्गाव ते वाणी पोलीस ठाणे येथे गावकऱ्यांनी पायी जात पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

दिंडोरी तालुक्यातील कृष्णगाव शिवारात अज्ञात मारेकर्‍यांनी आई व मुलाचा खून केल्याची काल घटना घडली होती. याप्रकरणी आज सकाळी येथील गावकऱ्यांनी एकत्र येत पायी जाऊन वणी पोलीस ठाण्यात निवेदन देत मारेकर्‍यांचा शोध घेऊन कडक कारवाई करणे तसेच गुन्हा फास्ट ट्रॅक  कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे.

कृष्णगाव शिवारात ओझरखेड धरण गाळपेरा क्षेत्रालगत असलेल्या शेळकेवाडी येथील एका झोपडीत शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सविता गोटीराम सहाळे (वय 30) व मुलगा करण गोटीराम सहाळे (वय 10) यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.

 

LEAVE A REPLY

*