Type to search

Featured सार्वमत

तर महापालिकेच्या मतदार यादीतून नावे वगळा!

Share

पोलीस वसाहतीतील नागरिकांचा संताप

अहमदनगर (प्रतिनिधी) – पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीमध्ये नागरी सुविधा पुरवता येत नसतील तर महापालिकेच्या मतदार यादीतून आमची नावे वगळावीत, अशी मागणी पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीतील नागरिकांनी केली. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी आज पोलीस मुख्यालयातील वसाहतीची मूलभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारीही तेथे उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि वसाहतीमधील कुटुंबातील महिला या वेळी उपस्थित होत्या. वसाहतीमधील नागरी सुविधा बाबा भावना तीव्र होत्या. मतदानाच्या वेळेस वसाहतीमधील नागरिकांची आठवण होते. परंतु सुविधा पुरवण्याची वेळ आल्यावर महापालिकेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकमेकांकडे बोट दाखवतात. यातून वसाहतीमधील नागरी सुविधा मिळत नाही. त्यापेक्षा महापालिकेच्या मतदार यादीतून आमचे नावच वगळावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी बोलून दाखवली.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी महापालिकेचे प्रभारी अधिकारी सुरेश इथापे यांना यावेळी धारेवर धरले होते. नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा प्रत्यक्ष पाहून सुरेश इथापे निशब्द झाले. मिटके यांच्या प्रश्नांच्या सरबतीसमोर इथापे त्यांच्याबरोबर असलेले महापालिकेच्या अधिकार्‍यांना तोंडातून शब्द फुटेना. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी या नागरी सुविधांची दखल घेत महापालिकेच्या अधिकार्‍यांना त्या पुरवण्याबाबत अल्टिमेटम दिला आहे. त्यावर महापालिका अधिकारी आता काय कारवाई करतात हे पा हणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!