अंगणवाडीतही निकृष्ट पोषण आहार

0

अंगणवाडी सेविकांचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेत थाळी नाद 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अंगणवाडी बालकांना देण्यात येणारा पोषण आहार (टीएचआर) हा निकृष्ट दर्जाचा आहे. एका सर्वेक्षणानुसार देण्यात येणार्‍या पोषण आहारातील केवळ तीन टक्के आहार बालके खातात. उर्वरित पोषण आहार फेकून देण्यात येतो, असा गंभीर आरोप राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला. मंगळवारी अंगणवाडी सेविकांच्या थकीत मानधन प्रश्‍नी जिल्हा परिषदेत जोरदार थाळीनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संघाच्या अध्यक्षा मंगला सराफ आणि कार्याध्यक्ष राजू लोखंडे यांनी केले.

यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे आणि महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे यांच्याशी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मार्चपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन थकीत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेने तातडीने थकीत मानधन द्यावे.

यासह अंगणवाडी कर्मचार्‍यांची मानधन वाढीची सरकारकडे शिफारस करून मानधन वाढवावे, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना आहार म्हणून टीएचआर दिला जातो. पण तो आहार मागील काही महिन्यांपासून मिळाला नाही. या आहाराच्या दर्जाबाबत त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला असून निकृष्ठ आहाराऐवजी खाण्यायोग्य आहार देण्यात यावा. एका सर्वेक्षणानुसार अंगणवाडीतील बालकांकडून पोषण आहार खाण्याचे प्रमाण अवघे 3 टक्के असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच बालकांच्या आहारासाठी दर वाढवून द्यावे, मार्च पासूनच्या मानधनाची रक्कम द्यावी, सेवा समाप्ती नंतर लगेच एकरक्कम द्यावी, टीएडीएची रक्कम त्वरीत देण्यात यावी, आदी मागण्या अंगणवाडी सेविकांनी यावेळी केल्या.
यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सेवासमाप्तीचा लाभाची रक्कम देण्यात यावी,

2017 चे परिर्वतन निधीचे पैसे देण्यात यावे, रिक्त जागेवर सेविका अन् मदतनीस यांची तातडीने नेमणूक करण्यात यावी, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक देण्यात यावा, योजनेच्या अंमलबजावणीसाठी छापील रजिस्टर्स व अहवाल फॉर्म देण्यात यावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात शांता गोरे, सुनीता कुलकर्णी, सुरेखा विखे, विजया घोडके, शोभा लोकरे, राठोड, छाया शिंदे, सुनंदा बेटकर, निलेश दाताखिळे, नादिरा नदाङ्ग, कविता पवार आदीसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*