अंगणवाडी सेविकांच्या विमा, कर्जाचे हप्त थकले

0

नविन वेतन प्रणाली : आर्थिक संकट ओढावण्याची भीती  

अहमदनगर (प्रतिनिधी) – नवीन वेतन प्रणालीमुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा विमा व पतसंस्थेचा हप्ता कपात होणे बंद झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे जून महिन्यांचे विमा आणि कर्जाचे हप्ते थकले आहेत. थकीत हप्त्यांचा डोंगर वाढल्यास अंगणवाडी सेविकांना विनाकारण व्याजाचा भुर्दंड बसण्याची भीती अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये पसरली आहे.

जिल्ह्यात 9 हजाराच्यांवर अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यापैकी कर्जत, जामखेड, राहाता व शेवगाव तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी 23 वर्षांपासून एलआयसीचा विमा हप्ता भरत आहेत. यापूर्वी पगारातून हप्त्याची रक्कम कपात होत असल्याने वेळेत हप्ते भरले जात. आता मात्र, शासनाच्या नवीन पगार प्रणालीनुसार हप्ता कपात होत नसल्याने चार तालुक्यांतील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा तीन महिन्यांपासून हप्ता थकला आहे.

याशिवाय अंगणवाडी कर्मचारी पतसंस्थेतून कर्ज घेणार्‍या जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचे हप्ते देखील कपात होत नसल्याने अंगणवाडी सेविका संभ्रम अवस्थेत आहेत. मे 2017 पर्यंत होणारी हप्ते कपात जूनपासून बंद झाली. यासंदर्भात शासन दरबारी वारंवार मागणी करूनही अद्याप प्रश्‍न सुटलेला नाही. कमी वेतनामध्ये भावी पिढीला पूर्वप्राथमिकचे धडे देण्याबरोबरच इतर कामे करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांचा एक प्रश्‍न प्रशासनाकडून सोडविला जात नाही.

नविन प्रणालीनुसार करण्यात येणारे मासिक वेतनही वेळेत होत नसल्याने रोख स्वरुपात हप्ते भरण्यास विलंब होत आहे. अंगणवाडी महिला सामान्य कुटुंबातील आहेत. मानधनतून थोडी फार रक्कम मागे पडावी. कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळावे. यासाठी सन 1994 मध्ये जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रयत्नातून झेडपीच्या अर्थ व वित्त विभागाची मंजुरी मिळवून ही योजना नगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीसांसाठी ऐच्छिक स्वरुपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

अखंडपणे गेली 23 वर्षे सुरू असणार्‍या योजना नवीन वेतन प्रणालीमुळे बंदच्या टप्प्यावर आहेत. मोठ्या कष्टाने एलआयसीच्या माध्यमातून बचत केलेली रक्कम काही वर्षात अंगणवाडी सेविकांना पूर्ण मिळणार आहे. मात्र, त्यासाठी उर्वरीत थोडे-फार हप्ते भरणे आवश्यक आहे. त्यामुळे आता आयुक्त कार्यालयाकडून करण्यात येणार्‍या नविन पगार प्रणालीतून हप्ते कपात करून सोसायटी, विमा हप्ता कपात करण्याची अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मागणी आहे.

 • शासनस्तरावरचा प्रश्‍न? – 
  यापूर्ची प्रकल्पस्तरावरुन वेतन केले जात होते. त्यामुळे काही तालुक्यात पगारातून हप्ता वसूल केला जात होते.आता आयुक्तस्तरावरुन पगार केला जातो.वेळेत पगार व्हावा .यासाठी नविन स्पॉटवेअर विकसित करण्यात आले आहे.जूनपासून थेट अंगणवाडी कर्मचार्‍यांना वेतन मिळते. सर्व सुरळीत होण्यासाठी आणखी कालावधी लागणार असून त्यानंतर वेळेत पगार होणार आहे. हप्ता कपातप्रश्‍नी यापूर्वी संबधित महिला कर्मचार्‍याबरोबर चर्चा झाली आहे. विमा हप्ता भरणे ही वैयक्तिक बाब आहे. त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीचा असल्याने त्यांच्याकडे मागण्या कळविण्यात आल्या आहेत.
  – मनोज ससे, महिला व बालकल्याण अधिकारी.
 • अंगणवाडी सेविकांना अगोदरच मानधन कमी आहे. त्यात पगार वेळेवर होत नाही. याबाबत वारंवार अंगणवाडी सेविका व मदतनिस कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढला. मात्र, त्यांच्या सर्व मागण्या शासनस्तरावरच्या आहेत. मागण्या रास्त आहेत. मात्र, आमच्या अधिकारात नसल्याने त्या सोडविण्यात अडचणी येतात. – अनुराधा नागवडे, सभापती महिला व बालकल्याण अधिकारी
 • एलआयसी केंद्र सरकारची असताना अडवणूक – 
  महिला सक्षमिकरणासाठी राज्य व केंद्र शासन विविध योजना व उपक्रम राबविते. त्यात अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे बालक घडविण्यात मोठे योगदान असताना त्यांच्या अडचणी सोडविल्या जात नाही. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी आहे. सदर योजना राबविताना शासनास आर्थिक बोजा नाही. याउलट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना संरक्षण व आधार देण्याच काम केल जात आहे. त्यामूळे नविन वेतन प्रणालीनूसार हप्ता कपात होणे गरजेचे असताना ती केली जात नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
  -प्रमोद छाजेड, भारतीय आयुर्विमा प्रतिनिधी
 • विधवा व सर्वसामान्य महिला आहेत. रोख स्वरुपात वेतन मिळाल्यावर न कळत घर खर्चासाठी वापरले जाते. त्यामुळे वेतनातूच हप्ता कपात व्हावा. अन्यथा आमचे हप्ते थकल्यास अधिक व्याज भरावे लागणार आहे.यापूर्वी वेतन थकले तरी, विमा प्रतिनिधी समजून घेत.त्यामूळे व्याज लागत नसे.
  – सुरेखा विखे,

  जिल्हा सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघ

LEAVE A REPLY

*