अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य कामे न देण्याचे निर्देश

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कमरचार्‍यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्यतिरिक्त कोणतीही योजनाबाह्य कामे न देण्याचे निर्देश महिला व बाल विकास विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत.
अंगणवाडीत सहा वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पुरकपोषण आहार, पूर्णशालेय शिक्षण या सेवा दररोज तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य संदर्भसेवा आणि पोषण व आरोग्य विषय शिक्षण या आरोग्य विषयक सेवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने दिल्या जातात.
अंगणवाडी केंद्राचे लाभार्थी व त्यांना देण्यात येणार्‍या सेवा पाहता, त्या नियमितपणे लाभार्थ्यांना पुरविणे, देशाची भावी पिढी निरोगी व सुदृध रहावी, या दृष्टीकोनातून आवश्यक आहे. त्यामुळे वर नमूद अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्यतिरिक्त जिल्हास्तरावरून गुडमॉर्निंग,
शेततळे बांधकाम, अन्न शिजवून देणे यासारखी कामे सोपविण्यात येतात. त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्यतिरिक्त कोणतीही कामे परस्पर देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आलेआहेत. तसेच कामे द्यावयाची असल्यास शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी, असे सूचविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*