Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशआंध्रप्रदेशात आता बलात्कार्‍याला 21 दिवसात फाशी

आंध्रप्रदेशात आता बलात्कार्‍याला 21 दिवसात फाशी

हैद्राबाद – महिलांच्या व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली.

एफआयआर दाखल केल्यानंतर 21 दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 मध्ये दुरूस्ती करून नवं 354 (ई) हे कलम तयार करण्यात आलं आहे.

- Advertisement -

भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असेल. तसंच याला आंध्र प्रदेश दिशा कायदाफ असं नाव देण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त आणखी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. महिला आणि बालकांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या