आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या उपोषणस्थळी एकाची आत्महत्या

0
नवी दिल्ली – आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आपल्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडूंनी राजधानी नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या उपोषणादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र भवनाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी व्यक्ती आंध्र प्रदेशमधीलच रहिवासी आहे. या व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटदेखील सापडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी नायडूंनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आंध्र भवनमध्ये त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी नायडूंनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी बोलताना पीएम मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यांनी वैयक्तिक टीका थांबवावी असे नायडू म्हणाले.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. आंध्रचे विभाजन झाल्याने तसेच विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाल्याने चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता. तेलुगू देसम पक्षाने दिलेल्या माहितीनुसार उपोषण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. उद्या (ता.१२) ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना  निवेदन सुद्धा देणार आहेत.

LEAVE A REPLY

*