…आणि पाकिस्तानी खेळाडूंचे नशीब फळफळले

0

यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान होता. या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला ठेच पोहचवत भारताचा दारूण पराभव केला आणि पाकिस्तानी खेळाडूंचे नशीब फळफळले.   पाकिस्तानी खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे.

पाकिस्तान संघाने पहिल्यादांच चॅम्पियन्स ट्रॉफी भारताविरुद्ध जिंकली आणि पाकिस्तानी खेळाडूंचे देशात जंगी स्वागत केल्यापासून बक्षीसांचा वर्षाव सुरु आहे.

आयसीसीकडून विजेत्या संघाला दिले जाणारे २० कोटी रुपयांचे बक्षीसही पाकिस्तानच्या संघाला मिळाले आहे.

पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंना प्रत्येक १ कोटी रुपय देण्याचे जाहीर केले आहे. तसेच पी. सी. बी. ने  खेळाडूंना २ कोटी ९० लाख बोनस देण्याची घोषणा केली आहे.

एका बिल्डरने प्रत्येक खेळाडूसाठी १० लाख आणि प्लॉट देण्याचीही घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

*