Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआनंदवली शाळेच्या विद्यार्थ्यांची हवाई सफर; सोबत मुख्यमंत्र्यांशी गप्पाही

आनंदवली शाळेच्या विद्यार्थ्यांची हवाई सफर; सोबत मुख्यमंत्र्यांशी गप्पाही

मुंबई | प्रतिनिधी

..आता विमानाने आलात..पुढे मानाने या..तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!” या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आनंदले नाशिक मनपा शाळेचे विद्यार्थी.

- Advertisement -

आनंदवली नाशिक येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रमाक-१८ च्या विद्यार्थी-विद्यार्थींना हवाई सफरीसह मुंबई दर्शनाची सहल मुख्याध्यापक कैलाश ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत आली होती.

या सहलीतील या विद्यार्थ्यांनी आज विधानभवनातील कामकाजाची माहिती घेतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाने विद्यार्थी- विद्यार्थींनी आनंदून गेले.

मुख्याध्यापक कैलाश ठाकरे आणि त्यांचे शिक्षक सहकाऱी कुंदा बच्छाव, अमित शिंदे, वैशाली भामरे यांनी नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या मदतीने महानगरपालिकेच्या शाळेतील सुमारे २५ विद्यार्थ्यांना विमान प्रवासासह मुंबई दर्शन तसेच विधीमंडळाच्या कामकाज पाहता येईल, अशा सहलीचे नियोजन केले.

या तीन दिवसीय सहलीत आज अखेरच्या दिवशी या विद्यार्थ्यांना विधीमंडळ कामकाज पाहण्याची आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याची संधी मिळाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले विमानाने नाशिकहून तुम्ही आलात याचा आनंद आहेच मात्र पुढल्या वेळी मानाने या असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या