Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले…

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तुरळक विरोध वगळता अनेकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले. काल गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत याबाबत घोषणा केल्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ बघायला मिळाला.

यामध्ये ३७० कलम अंतर्गत असलेले अनेक खंड लागू होणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जादेखील संपृष्टात आला आहे.

तसेच शाह म्हणाले की, जम्मू-कश्मीर वेगळा केंद्र शासित प्रदेश बनेल तसेच काश्मीरपासून लद्दाखला वेगळे करून तो स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनेल असेही सांगण्यात आले आहे.

यादरम्यान, समाजमाध्यमांत नियमित सक्रीय असलेले भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.  ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, काही निर्णय असे असतात की जे घेतल्यानंतर असे बोलले जाते की, हा निर्णय आधी का नाही घेतला गेला? यासारखाच आजचा हा केंद्र सरकारचा निर्णय आहे. पुढे ते म्हणतात आपल्या सर्वांसाठी अभिन्न आणि अखंड काश्मिरी नागरिकांना आपल्यात सामावून घेण्याची ही वेळ आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!