गोदावरी स्वच्छतेसाठी अतिरिक्त 65 कर्मचारी नियुक्त

0
नाशिक | गोदावरी स्वच्छतेसाठी महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय गोदावरीच्या एकूण 14 किलोमीटर पात्राच्या सभोवतालच्या स्वच्छतेसाठी 50 सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. परंतु आत पुन्हा अतिरिक्त 50 मीटर स्वच्छतेसाठी 65 कर्मचारयांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

गोदावरी स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने महापालिकेकेडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र कक्ष महापालिकेने स्थापन केला आहे. यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारंयाची नियुक्ती करण्यात आली आहे.

परंतु त्यानंतरही गोदावरी पात्राची स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोदाघाट परिसरासह प्रमुख भागात 50 माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोदाकाठावर प्रदूषण करणारयांवर जरब बसली आहे. या कर्मचारयांकडून दंडात्मक कारवाई करतांनाच, गोदाघाटावर नो वॉशिंग झोनमध्ये कपडे, वाहने धुणारया नागरिकांवर कारवाई केली जाते.

त्यामुळे काही प्रमाणात का होईना गोदावरी स्वच्छतेसाठी हातभार लागत आहे. परंतु कर्मचारयांची संख्या आणि गोदावरी पात्राचा आवाका पाहता याठिकाणी अतिरिक्त कर्मचारयांची नेमणूक गरजेची असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते. त्यानुसार आता अजून 65 कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले जाणार आहे.

या कर्मचारयांकडून गोदावरी परिसरात अस्वच्छता करणारयांना मज्जाव तसेच दंडात्मक कारवाईदेखील होणार आहे. त्यामुळे आता एकूण 115 कर्मचारी गोदावरी स्वच्छतेसाठी काम करणार आहेत. हे सर्व कर्मचारी दोन शिफटमध्ये स्वच्छतेवर वॉच ठेवणार आहेत.

LEAVE A REPLY

*