Wednesday, April 24, 2024
Homeनगरअमृताताईंच्या इंदोरीकरांना कानपिचक्या; ‘अशी’ विधानं करू नये : प्रभावाबद्दल भान राखावे

अमृताताईंच्या इंदोरीकरांना कानपिचक्या; ‘अशी’ विधानं करू नये : प्रभावाबद्दल भान राखावे

मुंबई – इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे काही व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. त्यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखत असल्याचे दिसून आले. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्यांनी महिलांचा आदर कमी होईल, अशी विधानं करू नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या त्यांनी इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केलं. मला इंदोरीकर महाराजांबद्दल आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात, असं सांगतानाच लोकांवर प्रभावपाडणार्‍या लोकांनी आपल्या मतांचा लोकांवर अधिक प्रभाव पडतो, याचं भान ठेवायला हवं, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

यावेळी त्यांनी विविध विषयांवर चौफेर मतं मांडली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात महिला मुख्यमंत्री होण्याचं पोटेन्शियल असल्याचं त्या म्हणाल्या. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रचंड काम केलं आहे. अशा व्यक्तिला महिलांची माफी मागायला लावण्याची आदित्य यांची कृती योग्य नव्हती. मनाला पटणारी नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची त्यांनी यावेळी मुक्तकंठाने स्तुती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या