अमृत योजनेसाठी आणखी प्रस्ताव पाठवा

महापालिकेच्या कामगिरीवर केंद्र सरकार खुश, उद्यानांसाठी आणखी मदत देणार

0
नाशिक, ता.१७, प्रतिनिधी- महापालिकेकडून अमृत योजनेंतर्गत मखमलाबाद, तवलीफाटा येथील उद्यानसाठी ३.५ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. तसेच दसक पंचक येथेही एका उद्यानचे काम वेगाने सुरू आहे. महापालिकेच्या या कामावर केंद्र शासन खुश असून त्यांच्याकडून आणखी काही उद्यानांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत नाशिक महापालिकेच्या हददीत दसक पंचक येथे सुमारे आठ एकर जागेत मोठया उद्यानाचे काम सुरू आहे. याशिवाय मखमलाबाद येथील तवलीफाटा येथेही आता नवीन उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेकडून पाठविण्यात आला होता. तो प्रस्ताव मंजुर झाला असून त्यासाठी ३.५ कोटी रूपये मंजुर झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

या योजनेंतर्गत पर्यावरण संवर्धन तसेच हरित शहराच्या दृष्टीने आणखी काही प्रकल्प करता येतील का तसेच त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. महापालिकेने या योजनेंतर्गत केलेल्या कामांची केंद्र सरकारने प्रशंसा केल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

त्यानुसार आता दुसरया टप्प्यात सातपुर, सिडको प्रभागासाठी एक तर मध्य नाशिकमधील शिवाजी उद्यान याबाबत प्रस्ताव पाठविण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान आता ३.५ कोटी प्राप्त झाल्यामुळे मखमलाबाद येथील उद्यानाचे काम वेगात सुरू होणार आहे.

पंचवटी भागासाठी एक हक्काचे उद्यान नागरिकांना मिळू शकणार आहे. याशिवाय नविन नाशिक, सिडकोतही नवीन उद्यानासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. या योजनेंतर्गत संपूर्ण नाशिक शहराला लाभ होईल यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. त्यानुसार नाशिकरोड येथे एक उद्यान झाल्यानंतर, पंचवटीतही उद्यान होईल म्हणून दुसरया टप्प्यात नविन नाशिक, सातपुरसाठी एक तर मध्य नाशिकसाठी एक उद्यान तयार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*