Visual Story : जेव्हा सुशांत सिंह राजपूतने बाऊन्सरवर उत्तुंग षटकार खेचला; मास्टर ब्लास्टरही झाला होता फिदा

Aniruddha Joshi

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) आजच्याच दिवशी २०२० साली निधन झाले. मुंबईमध्ये बांद्रा येथील राहत्या घरात त्याने आत्महत्या (Suicide) केली होती...

सुशांत

अतिशय कमी वयात जगाचा निरोप घेतलेल्या सुशांतने महेंद्रसिंग धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार माहीचे आयुष्य जगले.

या चित्रपटासाठी त्याने इतकी तयारी केली होती की सचिन तेंडुलकरदेखील त्याचे कौशल्य पाहून आश्चर्यचकित झाला होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनला सुशांतमध्ये एक अनुभवी क्रिकेटपटू दिसून येत होता.

यामागची घटना अशी की, सचिन आणि त्याचा मुलगा अर्जुन हे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गेले होते. ते दोघे तेथे नेटवर सराव करत होते. यावेळी धोनीच्या भूमिकेसाठी सुशांतला तयार करण्याची जबाबदारी भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज किरण मोरे यांच्यावर होती.

मोरे हे सुशांत कडून सराव करून घेत होते. तेव्हा सचिनने एका खेळाडूला नेटवर खेळताना पहिले. सचिनने मोरे यांना विचारले की, हा खेळाडू कोण आहे. मला त्याची फलंदाजी आवडत आहे.

अभिनेता सुशांत सिंह

तेव्हा मोरे म्हणाले की, हा अभिनेता सुशांत सिंग राजपूत आहे. तो धोनीच्या बायोपीकसाठी धोनीची भूमिका साकारत आहे. यावर सचिन म्हणाला, काय सांगतोस, एखादा अभिनेता नेटमध्ये खेळतोय, असे वाटतच नाही. तो तर एखादा अनुभवी क्रिकेटपटूसारखा खेळतोय, असे म्हणून त्याने सुशांतच्या फलंदाजीचे कौतुक केले.

यानंतर अर्जुनने सुशांतला गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. अर्जुनने मोरे यांना विचारले की तो बाऊन्सर टाकू शकतो का? मोरे यांनी होकार दिला. मग अर्जुनने सुशांतला बाऊन्सर टाकायला सुरुवात केली. सुशांतने बाऊन्सरवर धमाकेदार फलंदाजी केली.

त्याची फलंदाजी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. म्हणूनच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सुशांत सिंह राजपूतच्या फलंदाजीवर फिदा झाला होता.