Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

Dr. Pankaj Patil

दिल्लीमध्ये मुंबईतील तरुणी श्रद्धाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आफताब अमीन पूनावाला या तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच तरुणीचा जीव घेतला

आफताब अमीन पूनावाला, असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आफताब पूनावालाला अटक केली आहे.

श्रद्धा आणि आफताब मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथे दोघांची मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झाले श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघरची रहिवासी होती

दोघांच्या प्रेमप्रकरणाला श्रद्धाच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघे दिल्लीला पळून जात मेहरौलीतील एका परिसरात राहत होते.

त्यानंतर तरुणीच्या वडिलांना श्रद्धाला अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो होऊ न शकल्याने वडिलांना संशय आला आणि त्यांनी दिल्ली गाठली. 

वडिल मुलगी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोहचले, तेव्हा तिथे कुलूप लावल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी मेहरौली पोलीस ठाण्यात तरुणीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.

 पोलिसांनी आफताब पूनावालाला शनिवारी अटक केली. तेव्हा पोलीस चौकशीत आफताबने धक्कादायक खुलासे केले आहेत. श्रद्धाला त्याच्याशी लग्न करायचे असल्याने दोघांत भांडणे होत होती.

त्यामुळे आफताबने १८ मे २०२२ ला श्रध्दाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते तुकडे ठेवण्यासाठी त्याने फ्रीज विकत घेतला होता. १८ दिवस रात्री २ वाजता बाहेर पडून तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचं, आफताबने पोलीस तपासात सांगितलं.

त्याने नोंदवलेल्या जबाबात असे म्हटले आहे की क्राइम सीरिज डेक्स्टर पाहून त्याने हे कृत्य केले. त्याला कदाचित असे वाटले असावे सीरिजप्रमाणे तोही यातून वाचेल. पण सिनेमा आणि वास्तव जग यामध्ये फरक आहे, हे आफताब विसरला.