कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळूरूमध्ये लग्नगाठ; ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी वाचाच

Nilesh Jadhav

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांना आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे.

ऋषी यांच्या राजकीय कारकिर्दीप्रमाणेच त्यांची लव्हस्टोरीही खूप यशस्वी ठरली आहे. दोघांची लव्हस्टोरी खूप जुनी आहे.

ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे.

ऋषी सुनक यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडमधील 'विंचेस्टर कॉलेज'मधून केले. त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. २००६ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या शिक्षण घेत असताना ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची भेट झाली. अभ्यास करत असतानाच ते एकमेकांना भेटले. त्याचवेळी एकमेकांचं प्रेम जडलं.

ऋषि सुनक यांची उंची पाच फूट सहा इंच इतकी होती. तर अक्षता त्यांच्यापेक्षाही उंच होत्या. त्यामुळं ऋषि यांना नेहमीच अस्वस्थ वाटत असल्याचं पाहून अक्षता यांनी उचं टाचेच्या सँडल्स घालणं सोडून दिल्याचा खुलासा खुद्द ऋषि सुनक यांनी एका मुलाखतीत केला होता.

२००९ साली दोघांनी बंगळुरू येथे भारतीय पद्धतीनुसार लग्नही केलं. अक्षता इंग्लडमध्ये आपला फॅशन ब्रॅण्ड सांभाळत आहेत. तर, त्यांचा इंग्लडमधील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश आहे.

नारायण मूर्ती यांनी एकदा सांगितले होते की, 'जेव्हा अक्षताने मला तिच्या नवीन जोडीदाराबद्दल सांगितले तेव्हा मला खूप वाईट वाटले आणि हेवाही वाटला. पण जेव्हा मी ऋषी ऋषींना भेटलो तेव्हा मला समजले की तो खूप प्रामाणिक होता.