सुरगाणा : नाशिकचे 'काश्मीर', पाहा फोटो...

Aniruddha Joshi

दऱ्याखोऱ्यानी, सह्याद्री पर्वताच्या डोंगर रागांनी वेढलेला हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. सुरगाणा तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो.

पावसाळ्यात दुथडी भरून, खळखळून वाहणाऱ्या नद्या असलेला हा तालुका आहे. येथील शेती व्यवसाय संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे

या तालुक्यातील भिंतघर हे गाव "गुलाबी गाव" म्हणून ओळखले जाते. या गावात सगळ्या घराना गुलाबी रंग दिला आहे.ही संकल्पना एका जिल्हा परिषद शिक्षकानी रूचवली.गुलाबी रंगा हा स्री सबलीकणासाठी प्रतीक म्हणून त्यांनी या गावाचे देशांत नाव प्रव्यात आहे.

नाशिकपासून सुरगाणा ९० कि.मी. अंतरावर आहे. सुरगाणा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २७४६ चौरस किलोमीटर असुन या प्रदेशात १५०० ते २००० मी.मी. पर्यंत पर्जन्यवृष्टी होते.

पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जलसंपदा विभागाने 24 नोव्हेंबर 2006 ला मांजरपाडा या महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आहे.

सुरगाणा तालुक्यात यंदा झेंडू फुलांची शेती मोठ्या प्रमाणात बहरली आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा लांबी मिरचीचे पिक घेतले असून ही मिरची नाशिक आणि धुळे मार्केट परिसरात विक्रीसाठी जाऊ लागली आहे.

सुरगाणा तालुक्यातील आंबाड बंधारा फुल्ल झाला आहे.