Visual Story : केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत सुनील शेट्टी म्हणतात...

Aniruddha Joshi

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल चर्चेत आला आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीसोबत त्याच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आले आहे.

बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची अथिया मुलगी आहे. तिच्या लग्नाची बातमीवर आता सुनील शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील शेट्टी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मी ही बातमी वाचली आणि मला कळलेच नाही की मी आनंदी होऊ की दुःखी. मला कळत नाही की सत्य काय आहे ते माहिती नसताना कोणी अशी बातमी कशी देऊ शकतं.

सुनील शेट्टी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. बऱ्याच वेळा त्यांनी केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.

नुकतीच सुनील यांनी अथिया आणि राहुल २०२२ मध्ये लग्न करणार असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे. ही बातमी वाचल्यानंतर सुनील शेट्टी यांनी त्या वेबसाईटला ट्रोल केले आहे.

दरम्यान, राहुल आणि अथियाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. त्यांनी दिलेली ही बातमी ऐकल्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता.

या आधी अथिया बऱ्याचवेळा राहुलसोबत दिसली आहे. एवढचं काय तर राहुलची मॅच असेल तर अथिया त्याला सपोर्ट करण्यासाठी तिथे पोहोचायची.