अतिक्रमण, फेरीवाल्यांमध्ये हरवले नाशिकचे रस्ते

जितेंद्र झंवर

अवैध फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असताना ठाण्यात सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला. फेरीवाल्याने कोयत्याने हल्ला केल्यामुळे पिंपळे यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. नाशिकमधील परिस्थिती वेगळी नाही.

नाशिकमधील भांडी बाजार, सराफ बाजार, दहिपुल भागांत वाहन चालवणेपेक्षा पायी जाणेही अवघड झाले आहे. यावेळी एकमेकांना धक्के देत वाट काढावी लागत असल्यामुळे किरकोळ भांडणेही होत असतात.

मनपा ठाण्यातील घटनेपासून काही धडा घेणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.