Visual Story : अबब! 'पुष्पा'च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

Aniruddha Joshi

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी (samantha akkineni) चर्चेत आहे. सध्या ती ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे तिला सर्वत्र चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

यात तिने केलेल्या डान्सचे अत्यंत कौतुक होत आहे. या आयटम साँगसाठी तिने कोट्यावधी रुपयांचे मानधन आकारल्याची चर्चा नुकतीच रंगली. आता तिने घेतलेल्या मानधनाचा खरा आकडा समोर आला आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

समांथाने या चित्रपटात पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे.

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ हे गाणे केवळ ३ मिनिटांचे आहे. या आयटम साँगसाठी समांथाने १ किंवा २ कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर येत होती.

हे गाणे सध्या खूपच लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या गाण्यासाठी समांथाने ५ कोटी रुपये मानधन आकरले आहे.

विशेष म्हणजे समांथाने या गाण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. पण अल्लू अर्जुनने तिला हे आयटम साँग करण्यासाठी विनंती केली होती. या विनंतीनंतरच तिने या गाण्याला होकार दर्शवला होता.