Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्...

Aniruddha Joshi

गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakeray) चर्चेत आहेत.

नुकतीच एका वृत्तवाहिनीला राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मुलाखत दिली.

त्यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील अनेक किस्से शेअर केले.

यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना दुबईहून धमकीचा फोन आल्याचा खुलासा त्यांनी केला.

हा किस्सा राज ठाकरेंकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी असतानाचा आहे.

दुबईहून फोन आला तेव्हा तो फोन शर्मिला ठाकरे यांनी उचलला.

फोनवरील व्यक्तीने राज ठाकरेंना जपून राहण्याचा इशारा दिला.

राज ठाकरे

मात्र फोनवरील व्यक्ती नेमकी कोण? याबाबत राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी कुठलाही खुलासा केला नाही.