धमाका होणार; तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात, हे आहेत १५ जण

जितेंद्र झंवर

सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विशाल निकम बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे.

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्नेहा वाघ आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये दिसणार आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री मिरा जगन्नाथ आता बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

मराठी मालिकांसोबत, नाटक आणि सिनेमांमध्ये आपली ओळख निर्माण केलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर तिसऱ्या पर्वात सहभागी झाला आहे.

अभिनेत्री सुरेखा कुडची 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.

अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सामील झाला आहे.

अभिनेत्री गायत्री दातार आता बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे.

किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील अवघ्या पाच वर्षांची असल्यापासून किर्तन करत आहे. त्याही बिग बॉसमध्ये दिसणार आहे.

लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा जय दुधाणे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

मीनल शाह 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सामील झाली आहे. मीनल डिजिटल क्रिएटर आणि डान्सर आहे.

HP

‘डॅडी’ चित्रपटात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

मराठीचा बप्पी लहिरी म्हणजेच संतोष चौधरीची बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये एण्ट्री झाली आहे.