VISUAL STORY : IAS टीना डाबी पुन्हा अडकणार विवाहबंधनात; या मराठी अधिकाऱ्यासोबत बांधणार लगीनगाठ

Nilesh Jadhav

युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC Civil Service Examination) वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात प्रथम क्रमांक पटकवणारी आयएएस अधिकारी टीना दाबी (IAS Tina Dabi) पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे.

टीना डाबीनं (Tina Dabi Second marriage )याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. टीना डाबी आयएएस प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांच्यासोबत लवकरच लग्न करणार आहे.

आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) हे टीना डाबीपेक्षा १३ वर्षाने मोठे असून ते २२ एप्रिल रोजी लग्न करणार आहेत. प्रदीप गावंडे २०१३ मधील बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांचा देखील हा दुसरा विवाह असेल.

प्रदीप गावंडे यांनी चुरु जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला.

टीना डाबी यांनी याआधी २०१८ चे आयएएस अतहर खान (Athar Aamir Khan) यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. अतहर खान २०१६ युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते.

ट्रेनिंगदरम्यान टीना आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. २०१८ मध्ये त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती.