पावसाचे थैमान! बंगळुरुत जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी साचले पाणी; 'पाहा' फोटो...

Aniruddha Joshi

बंगळूरूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे कोरमंगलासह इतर परिसरात पाणी साचले आहे.

या पावसामुळे बंगळूरूमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचे चित्र आहे.

शहरी वस्तीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक रस्तेदेखील पाण्याखाली गेले आहेत.

अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरपरिस्थितीमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

अनेक वाहने पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेंत. वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

बचाव पथकाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. हवामान विभागाकडून बंगळूरूसह कर्नाटकात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.