Visual Story : हार्दिक पटेलांचा नवा लूक चर्चेत; काँग्रेसला करणार बाय-बाय?

Aniruddha Joshi

पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. आता गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा होत आहे.

हार्दिक पटेल यांनी आपला व्हॉट्सॲप डीपी नुकताच बदलला आहे. गुजरात निवडणुका तोंडावर असतानाच त्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो लावला आहे.

त्यामुळे पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपसोबत टेलिग्रामवरील फोटो देखील बदलल्याचे समजते.

हार्दिक पटेल हे सध्या गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते पक्ष सोडणार याबाबतचे वृत्त याआधीदेखील समोर आले होते. पक्षात निर्णय घेण्याबाबत आपल्याकडे कुठलाही अधिकार नसल्याची खंत त्यांनी याआधी बोलावून दाखवली होती.

काही दिवसांपूर्वी हार्दिक यांनी आपण प्रभू श्रीरामांचा खूप मोठा भक्त असल्याचे म्हंटले होते. आता त्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो व्हॉट्सॲपवर टाकल्याने ते काँग्रेसला रामराम ठोकणार, अशा चर्चा रंगत आहेत.