Visual Story : अलविदा! फिरकीच्या जादुगाराला अखेरचा निरोप

Aniruddha Joshi

क्रिकेटच्या विश्वातील फिरकीचा जादुगार शेन वॉर्नचे (Shane Warne) दि. ०४ मार्चला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज मेलबर्न येथील सेंट किल्डा फुटबॉल क्लब (St Kilda Football Club) च्या मैदानातून शेन वॉर्नला अखेरचा निरोप देण्यात आला...

यावेळी वॉर्नची तीन मुले ब्रुक, जॅक्सन आणि समर यांच्यासह वॉर्नचे आई वडील उपस्थित होते. त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मार्क टेलर, एलन बॉर्डर, इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकल वॉन यांच्यासह वॉर्नच्या अनेक चाहत्यांनी त्याला अखेरचा निरोप दिला.

शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे की संशयास्पद याबाबत सोशल मिडीयावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात समोर आले होते. याप्रकरणी थायलंड पोलिसांनी तपासही केल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर मागच्या आठवड्यात खासगी जेटने वॉर्नचे पार्थिव थायलंडहून मेलबर्नला आणण्यात आले. आज त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.