अमिताभ बच्चनच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाला ५२ वर्ष

जितेंद्र झंवर

चित्रपट रसिकांच्या मनावर गेली अनेक वर्षे गारुड करणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सृष्टीत ५२ वर्षांचा प्रवास पुर्ण केले. स्वत: टि्वट करत पहिला चित्रपट सात हिन्दुस्थानीमधील फोटोही त्यांनी शेअर केला.

सात हिन्दुस्थानी हा पहिला चित्रपट १५ फेब्रवारी १९६९ मध्ये अमिताभ यांनी साईन केला. त्यानंतर ७ नोव्हेंबर १९६९ रोजी हा चित्रपट पुर्ण झाला.

ख्वाजा अहमद अब्बास द्वारा लिखित व निर्देशित हा चित्रपट सात भारतीयांच्या अदम्य साहासची कथा आहे. ज्यांनी गोवातून पुर्तगाली शासन संपवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली.

सात हिन्दुस्थानी या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले. तेव्हापासून सुरु झालेला अमिताभ बच्चन यांचा प्रवास अजूनही सुरु आहे. त्यांनी २०० पेक्षा जास्त हिट चित्रपट दिले आहे.

आता अयान मुखर्जी निर्देशित ब्रह्मस्त्र चित्रपटात अमिताभ दिसणार आहे. त्यात आलिया भट्ट व रणबीर कपूरही आहे. तसेच अजय देवगनच्या मेडे या चित्रपटात अमिताभ असणार आहे.

अमिताभ बच्चन यांना सर्वांत पहिली नोकरी कोलकाता शहरात मिळाली होती. त्यावेळी ट्राम प्रवासासाठी दोन रुपयांचा पास मिळत असे. दोन रुपयांच्या पासवर तुम्हाला शहरभर कुठेही प्रवास करता येत असे, अशी आठवण बिग बींनी नुकतीच सांगितली.