रणबीर-आलिया का पोहचले जोधपूरला?

जितेंद्र झंवर

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नांच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. यावेळी रणबीर आपल्या वाढदिवसाच्या (28 सप्टेंबर) निमित्ताने एका दिवसापूर्वीच आलिया भट्टला सोबत घेऊन जोधपूरला पोहोचला.

विशेष म्हणजे, या कपूर आणि भट्ट कुटुंबीय सुद्धा रविवारीच जोधपूर विमानतळावर स्पॉट झाले. यानंतर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणबीर आणि आलिया लवकरच विवाह करणार असे वृत्त आहे. एवढेच नव्हे, तर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने ते आपल्या लग्नाचे डेस्टिनेशन ठरवण्यासाठीच जोधपूरला आले असे म्हटले जात आहे.

रणबीर आणि आलिया यांच्या कुटुंबियांनी गतवर्षी न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी रणथंभोर गाठले होते. त्यावेळी याच ठिकाणी दोघांनी साखरपुडा केल्याची चर्चा होती.