IND vs BAN 3rd ODI : किंग कोहलीचे शानदार शतक; 'या' बड्या क्रिकेटपटूचा मोडला रेकॉर्ड

Aniruddha Joshi

भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) 85 बॉलवर 103 रन केले आहे...

बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि ईशान किशन हे मैदानावर उतरले.

धवन 3 धावांवर तंबूत परतला. ईशान किशन खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघासाठी धावा काढल्या. विराट कोहलीने सामन्यात जोरदार शतक झळकावले.

विराट कोहलीने आपले 44 वे वनडे शतक पूर्ण केले आहे. तर एकदिवसीयमध्ये 72 वे शतक झळकावले. त्याने 85 चेंडूत एक षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७१ शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे सोडले आहे.