पीव्ही सिंधूची ऐतिहासिक कामगिरी! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात मारली बाजी

Nilesh Jadhav

सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) हीचा पराभव करत विजेतेपद पटकावलंय.

पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे.

या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

दोन वेळेची या ऑलम्पिक विजेती असलेली पीव्ही सिंधू सिंधूचे हे या हंगामातील तिसरे विजेतेपद ठरले आहे. याआधी तिने दोन सुपर ३००च्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्वित्झर्लंडच्या योनक्स स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत.