IND vs SL : भारताचा ऐतिहासिक विजय! 'ही' कामगिरी करणारा जगातील पहिला संघ

Nilesh Jadhav

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन सत्रातच भारताने लंकेचा दुसरा डाव २०८ धावात गुंडाळला. भारताने दुसरी कसोटी २३८ धावांनी जिंकत दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पार पडला. हा दिवस-रात्र कसोटी सामना होता.

भारतीय संघाचा घरच्या मैदानावरील हा सलग १५वा कसोटी मालिका विजय ठरला असून जगातील कोणत्याही संघाला आजवर अशी कामगिरी करता आली नाही.

सामन्यात आधी भारताने २५२ धावा करत श्रीलंकेला १०९ धावांत सर्वबाद केलं. ज्यानंतर दुसऱ्या डावात ३०३ धावा करत श्रीलंकेसमोर ४४६ धावांचे आव्हान ठेवले. पण श्रीलंकेचा संघ २०८ धावांत सर्वबाद झाल्याने भारत २३८ धावांनी विजयी झाला आहे.

भारताच्या विजयाचा शिल्पकार श्रेयस अय्यर ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकावीर म्हणून रिषभ पंतचा सन्मान करण्यात आला.